पुणे हिट अँड रन प्रकरणात अभिजित घटकांबळे याचा मोबाईल पोलिसांनी केला जप्त

पुणे हिट अँड रन प्रकरणात अभिजित घटकांबळे याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे हिट अँड रन प्रकरणात अभिजित घटकांबळे याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळत आहे. घटकांबळे ससून रुग्णालयातील शव विच्छेदन विभागातील शिपाई आहे.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर तावरे आणि घटकांबळे याचे फोनवरुन अनेकवेळा संभाषण झाल्याची माहिती आहे. तावरेच्या सांगण्यावरून घटकांबळे याने तीन लाख रुपये श्रीहरी हळनोर याला दिल्याची माहिती मिळत आहे.

तावरे याच्या व्यातिरिक्त घटकांबळे याचे अजून कोणाशी बोलणे झाले याचा पोलीस करणार तपास असून मोबाईलमधील महत्वाचा डाटा रिकव्हर करण्यासाठी त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com