aditya thackeray konkan tour : आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात

aditya thackeray konkan tour : आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात

Published by :
Shweta Chavan-Zagade

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्याच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याची घटना घडली. सुरक्षा ताफ्यातील दोन ते तीन गाड्यांना अपघात झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa highway) खारेपाटण चेक पोस्ट नजीक हा अपघात झाला आहे.

मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना खारेपाटण येथील हॉटेल मधुबन या ठिकाणी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागे या गाड्या असताना, एका गाडीने ब्रेक मारला असता. ताफ्यातील दोन ते तीन वाहने एकमेकांवर आदळल्या. या अपघातात कोणी जखमी झाले नसून या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com