सर्व सामान्य प्रवाशांसाठी वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता 'वंदे साधारण एक्स्प्रेस'

सर्व सामान्य प्रवाशांसाठी वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता 'वंदे साधारण एक्स्प्रेस'

वंदे साधारण ही एक्सप्रेस नुकतीच चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून तयार होऊन मुंबईत दाखल झाली आहे.
Published by :
Team Lokshahi

आता प्रवाशांसाठी 'वंदे साधारण एक्सप्रेस' प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. वंदे भारतच्या धरतीवर बनवण्यात आलेली ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेली सुपरफास्ट नॉन एसी एक्सप्रेस आहे. वंदे साधारण ही एक्सप्रेस नुकतीच चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून तयार होऊन मुंबईत दाखल झाली आहे.

फेब्रुवारी 2019 मध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यापासून उच्च आणि मध्यमवर्गीय प्रवाशांच्या पसंतीस उतरली, मात्र गरीब आणि सर्वसाधारण प्रवाशांसाठी देखील त्याच दर्जाच्या सोयी आणि सुविधांसह कमी किमतीत प्रवास करण्यासाठी वंदे साधारण एक्सप्रेस बनवण्यात आली आहे. एक्सप्रेसमध्ये 12 स्लीपर नॉन एसी कोच, आठ जनरल कोच, आणि दोन कोच असणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मजूर आणि कामगार वर्गासाठी हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ताशी 130 च्या वेगाने ही गाडी धावेल. या गाडीला खास असा भगवा आणि करडा रंग देण्यात आलेला आहे. सध्या तरी ही गाडी मुंबईमध्ये कसारा घाटात वेगवेगळे परीक्षण करण्यासाठी आणण्यात आलेली आहे. या परिसरांमध्ये ही गाडी पास झाली की ताबडतोब महत्त्वाच्या शहरांमध्ये ही गाडी चालवण्यात येण्याची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुंबईमधून ही गाडी मुंबई ते दिल्ली आणि मुंबई ते पटना त्या दोन मार्गांवर चालवण्याची दाट शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com