महाराष्ट्र
Ajit Pawar Pune News : ॲालिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; मात्र काही पदं...
अखेर ॲालिंम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.
अखेर ॲालिंम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या विरोधात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे मैदानात होते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात होते.
अखेर शेवटच्या क्षणी मुरलीधर मोहोळ यांनी एक पाऊल मागे येत अजित पवार यांच्यामध्ये समझोता केला आहे. चार वर्षाच्या टर्म मध्ये अजित पवार दोन वर्षे तर नंतरची दोन वर्षे मोहोळ हे अध्यक्ष पद सांभाळतील अशी माहिती आहे.
तसेच मोहोळ गटाकडून सचिव पदी संजय शेटे यांची निवड तर वरिष्ठ उपाध्यक्ष आणि खनिज दार हे ही पदे मोहोळ गटाकडे राहण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठीने सर्वात आधी ही बातमी दिली होती.

