अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन; शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर जाणं अजित पवारांनी टाळले

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन; शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर जाणं अजित पवारांनी टाळले

पिंपरी चिंचवडमध्ये नाट्य संमेलनाला सुरुवात झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पिंपरी चिंचवडमध्ये नाट्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील नाट्य संमेलनात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येण्याची शक्यता होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकाच मंचावर येणे टाळल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यातील नाट्य संमेलनाला अनुपस्थित राहिलेले शरद पवार आज पिंपरीतल्या नाट्य संमेलनाला उपस्थित राहिलं आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही या सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत.

यंदा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे 100 वे वर्ष आहे. याच पार्श्वभूमीवर भव्य नाट्य दिंडी काढण्यात आली. या भव्य नाट्य दिंडीत अनेक कलाकारांनी आवर्जून उपस्थिती लावली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com