Shivsena
Shivsena

Shivsena : शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज कोकण भवनला जाणार नाहीत; आज 10 वाजेपर्यंत हॉटेलमधून चेकआउट करण्याचे आदेश

एकनाथ शिंदे यांचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आज गट स्थापन करण्यासाठी कोकण भवन येथे जाणार होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Shivsena ) महापालिका निवडणुकीत महायुतीने चांगले यश मिळवले. महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि आता महापौर कुणाचा बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.

गेल्या तीन दिवसापासून नवनिर्वाचित नगरसेवक हे या हॉटेलमध्ये थांबून आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आज गट स्थापन करण्यासाठी कोकण भवन येथे जाणार होते. मात्र आता शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज कोकण भवनला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी ताज लँड्स एंड हॉटेलमधून चेकआउट केले असल्याची माहिती मिळत असून नगरसेवकांना आज सकाळी 10 वाजेपर्यंत हॉटेलमधून चेकआउट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.आज सर्व नगरसेवक कोकण आयुक्तांच्या भेटीसाठी जाणार होते मात्र आजचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. अचानक हा निर्णय बदलल्याने आता चर्चा रंगल्या आहेत.

Summary

  • शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज कोकण भवनला जाणार नाहीत

  • अनेक नगरसेवकांनी केलं ताज लॅंड्स एंड हॉटेलमधून चेकआउट

  • नगरसेवकांना आज 10 वाजेपर्यंत चेकआउट करण्याचे आदेश

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com