मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अंतरवाली ग्रामपंचायतीचा पाठिंबा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अंतरवाली ग्रामपंचायतीचा पाठिंबा

अंतरवाली सराटीत आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु झालं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अंतरवाली सराटीत आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु झालं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात झाली.

अंतरवाली ग्रामस्थांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध करण्यात आला होता मात्र आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अंतरवाली ग्रामपंचायतीचा पाठिंबा मिळाल्याची माहिती मिळत आहे. अंतरवाली ग्रामसभेच्या बैठकीत हा निर्णय झाला.

उपोषणाबाबत बैठकीत 5 सदस्यांचा बाजूने तर 5 जणांचा विरोधात निर्णय घेतला. सरपंचे यांचे विशेष अधिकार वापरून सर्वानुमते पाठिंबा देत उपोषणास परवानगी दिली असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com