Ashadhi Ekadashi : यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी; शासनाकडून निर्णय जारी
(Ashadhi Ekadashi) यंदाही पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शासनाकडून हा निर्णय जारी करण्यात आला असून पंढरपूरला जाणाऱ्या 10 मानाच्या पालखी मार्गावर ही टोलमाफी असणार आहे. पंढरपूरला जाणाऱ्या जड आणि हलक्या वाहनांना टोलमाफी मिळणार असून वारकरी, मानाच्या पालख्या आणि भाविकांना ही टोलमाफी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने 18 जून ते 10 जुलै दरम्यान ही टोलमाफी असणार आहे. राजभरातून अनेक वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंड्या घेऊन पंढरपूरला पायी जात असतात.
या टोलमाफीसाठी चालकाचे नाव, गाडीचा नंबर नोंद करून त्याचे स्टिकर्स, परिवहन विभाग, पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.