Balya Mama Mhatre : या देशात एक परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे

Balya Mama Mhatre : या देशात एक परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे

काँग्रेसच्या भिवंडी शहर मध्यवर्ती कार्यालयात बाळ्या मामा म्हात्रे यांच्या जाहीर प्रचारासाठी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar

काँग्रेसच्या भिवंडी शहर मध्यवर्ती कार्यालयात बाळ्या मामा म्हात्रे यांच्या जाहीर प्रचारासाठी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळ्या मामा म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळ्या मामा म्हात्रे म्हणाले की, भिवंडी हा काँग्रेसचा गड होता आहे आणि राहिल. हे त्या 20 मे रोजी मतदानाच्या माध्यमातून सर्व नेते मंडळी जोमाने काम करुन हा जो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, या देशात एक परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे. म्हणूनच त्या लाटेत आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत आणि हा काँग्रेसचा गड हा महाविकास आघाडीचा गड आबाधित राहिल. अशा प्रकारची काम किंवा प्रचारयंत्रणा असेल, मतदान असेल हे भिवंडीकरांच्या माध्यमातून होणार एवढे निश्चित. असे बाळ्या मामा म्हात्रे यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com