”राज्यातील वारकऱ्यांनी संयम पाळावा”, बंडातात्या कराडकरांचे आवाहन

”राज्यातील वारकऱ्यांनी संयम पाळावा”, बंडातात्या कराडकरांचे आवाहन

Published by :

प्रशांत जगताप | राज्य सरकारनं पायी वारीला परवानगी नाकारली असताना देखील आज कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर पायी चालत पंढरीकडे निघाले होते. यावेळी बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावर आता वारकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान या अटकेनंतर बंडातात्या कराडकरांनी वारकऱ्यांना आवाहन केले आहे.

येत्या चार दिवसात पायी वारी आंदोलनाविषय ठोस भूमिका घेतली जाईल तोपर्यंत राज्यातील जनतेने व वारकऱ्यांनी संयम पाळावा असे आव्हान बंडातात्या कराडकर यांनी केला.

पुणे येथुन पायी वारी आंदोलनातुन पोलिसांनी मला थेट कराडला आणले. मी पुजा झाल्याशिवाय पाणी ही घेत नाही माझे जागी दुसरा कोणी असता तर वाईट हाल झाले असते. पोलिसांनी त्यांचे काम केले माझी तक्रार नाही, असेही बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com