Winter Session 2023 : नागपुरात विधानभवनाच्या प्रवेशद्वारासमोर बॅनरबाजी

Winter Session 2023 : नागपुरात विधानभवनाच्या प्रवेशद्वारासमोर बॅनरबाजी

विधानसभा अधिवेशन कामकाजाचा आज तिसरा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधानसभा अधिवेशन कामकाजाचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्याच दिवशी नागपुरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर केलेल्या बॅनरबाजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक मोठा पोस्टर सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता.

आज शिंदे यांच्या बरोबरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या केंद्रीय नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही मोठे कट आऊट लावण्यात आले आहेत. त्यामुळे महायुतीकडून आता अधिवेशन परिसरात शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.

तसेच आज तसेच आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे हे अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे.अनेक मुद्द्यांवर आज नागपुरात मोर्चे निघणार आहेत. आज विधीमंडळावर अनेक मोर्चे देखील धडकणार आहेत. विरोधी पक्ष नेते विजय बडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले तसेच काँग्रेस पक्षाचे नेते काँग्रेसच्या मोर्चात सहभागी होणार आहेत.  विधानसभेत अवकाळी पावसावर चर्चा होणार असून अनेक मुद्द्यांवर देखिल चर्चा होणार आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com