नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट; दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी

नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट; दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी

राज्यभरात गणेश विसर्जनाची धूम असताना नाशिकमधून धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

नाशिक : राज्यभरात गणेश विसर्जनाची धूम असताना नाशिकमधून धक्कादायक प्रकार समोर येत आहे. नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. मिरवणुकीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. भद्रकाली परिसरात ही घटना घडली आहे. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट; दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी
गणेश विसर्जनाला पावसाची जोरदार हजेरी; काय आहे आजचा अंदाज? जाणून घ्या

नाशिकमध्ये भद्रकाली परिसरात दोन तरुणांमध्ये हाणामारी झाली आहे. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याचे समजत आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. तर दुसऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. मद्यधुंद अवस्थेत हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com