Belagavi Municipal Election | मध्यवर्ती एकीकरण समिती आक्रमक; कागदपत्रे मराठीत उपलब्ध करण्याची मागणी

Belagavi Municipal Election | मध्यवर्ती एकीकरण समिती आक्रमक; कागदपत्रे मराठीत उपलब्ध करण्याची मागणी

Published by :

नंदकिशोर गावडे | बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून निवडणूकीत अर्जासह संबधित अन्य कागदपत्रे कन्नड भाषेमध्ये उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयावर मध्यवर्ती एकीकरण समिती आक्रमक झाली असून कागदपत्र ही कन्नडसह मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध करावीत यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

बेळगाव महानगरपालिकेचीं निवडणूक जाहीर झाली असून 16 ऑगस्ट पासून निवडणूक प्रकियेला सुरवात झाली आहे.सदर निवडणूकमध्ये अर्जासह संबधित अन्य कागदपत्रे ही आयोगाने कन्नड भाषेमध्ये उपलब्ध केली आहेत. यासंबधी आज मध्यवर्ती एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात अर्ज हे फक्त्त कन्नड भाषेमधेच छापलेले आहेत, त्यामुळे हे अर्ज मराठी भाषिकांना त्रासदायक ठरत असल्याचे म्हटले. तसेच सर्व कागदपत्र ही कन्नडसह मराठी व इंग्रजी भाषेमध्ये ही उपलब्ध करावीत असे मागणीवजा निवेदन दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com