Crime
CrimeTeam Lokshahi

सोडून गेलेली बायको परत आणण्याचे आश्वासन; भोंदूबाबाची तरुणाने केली निर्घृण हत्या

विरारमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.

संदीप गायकवाड | विरार : विरारमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. सोडून गेलेली बायको परत आणून देण्याचे आश्वासन दिलेल्या भोंदूबाबाच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे. भिवा भिखा वायडा (वय 75) असे हत्या झालेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. तर विनोद उर्फ कांद्या महादू बसवंत (वय 35) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

विनोद बसवंत याने सोडून गेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी भोंदूबाबाशी संपर्क साधला होता. परंतु, दोन हजार रुपये देऊन पूजाअर्चा करून सुद्धा बायको परत आली नाही. या रागातून दारूच्या नशेत भोंदूबाबाच्या डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. विरार पूर्व मांडवी हद्दीत उसगाव परिसरात 24 मे रोजी ही घटना घडली आहे. याबाबत मांडवी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला 24 तासाच्या आत पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com