Devendra Fadnavis - Eknath Shinde : मुख्यमंत्री फडणवीस - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री मोठी बैठक; नेमकं काय घडलं?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis - Eknath Shinde) महापालिका निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकांसाठी आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने पुढील निवडणुकांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
अनेक चर्चा, बैठका होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता हिवाळी अधिवेशनातच निवडणुकांची तयारी सुरु झाल्याचे पाहायला मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोठी बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत 4 तास चर्चा झाल्याची माहिती मिळत असून
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती होती. युतीची चर्चा आणखी पुढे नेण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दोन्ही पक्ष निर्देश देणार असल्याची माहिती मिळत असून आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनीती या बैठकीच ठरली असल्याची माहिती मिळत आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Summery
हिवाळी अधिवेशनातच निवडणुकांची तयारी सुरु
शिंदे -फडणवीस यांची रात्री बैठक
रवींद्र चव्हाण,मंत्री बावनकुळे यांचीही उपस्थिती
