भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी भरले खड्डे; डोंबिवलीतील प्रकार

भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी भरले खड्डे; डोंबिवलीतील प्रकार

Published by :

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनेक रस्त्यांवरती खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यातच डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या ठाकुर्ली उड्डाणपूल खड्डेमय झाला आहे.

यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रेती वाहून आली आहे. यामुळे रस्ता निसरडा झालायं. तसेच खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांनी पुलावरील खड्डे भरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com