भाजप आमदार राजेंद्र पाटनी यांचे दोन्ही पाय आणि हात छाटू; शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळेंचे आव्हान

भाजप आमदार राजेंद्र पाटनी यांचे दोन्ही पाय आणि हात छाटू; शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळेंचे आव्हान

लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यत वाद विकोपाला गेला. या विकोपामुळे एकच खळबळ उडाली. या वादावरून भाजपचे कारंजा येथील आमदार राजेंद्र पाटनी यांनी यवतमाळ जिल्ह्यात पाय ठेऊन दाखवावा. त्यांचे दोन्ही पाय आणि हात छाटून गळयात लटकउ ,असा आव्हान शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी दिले.

प्रजासत्ताक दिनी खासदार भावना गवळी व भाजपचे आमदार राजेंद्र पाटनी यांच्यात वाशिम जिल्ह्यात वाद झाला. एकेरी शब्दात खासदार गवळी यांच्याशी बोलून अपमान केला. या घटनेचा यवतमाळ येथे आज निषेध नोंदवला. आमदार राजेंद्र पाटनी यांनी यवतमाळ जिल्ह्यात पाय ठेऊन दाखवावा. त्यांचे दोन्ही पाय आणि हात छाटून गळयात लटकवू आणि खासदार गवळी यांच्याबद्दल कुणीही शब्द काढल्यास मान छाटू, असे खुले आव्हान संतोष ढवळे दिल्याने खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com