अखेर १८ दिवसांनी नितेश राणे आले समोर…

अखेर १८ दिवसांनी नितेश राणे आले समोर…

Published by :

भाजप आमदार नितेश राणे अखेर १८ दिवसांनी माध्यमांसमोर आले आहेत. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. मात्र ते कुठे होते याचा कुणालाच काही थांगपता नव्हता. आज अखेर ते माध्यमांसमोर आले आहेत.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून ते अज्ञातवासात होते. ते नेमके कुठे आहेत याची कोणालाही माहिती नव्हती. दरम्यान नितेश राणे हेच या प्राणघातक हल्ल्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा आरोप होता. मात्र आता १८ दिवसांनी नितेश राणे माध्यमांसमोर आले.कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील नूतन अध्यक्षांची भेट घेत अभिनंदन केलं. यावेळी त्यांना भेटण्यासाठी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com