जालन्यात भाजपचं मटके फोड आंदोलन

जालन्यात भाजपचं मटके फोड आंदोलन

Published by :

जालन्यात भाजपच्यावतीनं मटका फोड आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केलाय. जालना जिल्ह्यात भाजपच्यावतीनं पाच ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. त्यात मुख्य म्हणजे औरंगाबाद-नांदेड हायवे जाम करीत वाटूर फाट्यावर चक्का जाम आंदोलन केलंय.. यावेळी माजी मंत्री तथा भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी संबळ वाजवून ठाकरे सरकारचा निषेध केलाय .त्याचबरोबर मटके फोडून ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीये.. दरम्यान ओबीसींचं आरक्षण रद्द होणं हे ठाकरे सरकारचं पाप असून येणारं पावसाळी अधिनेशन चालू देणार नसल्याचा इशारा यावेळी बबनराव लोणीकर यांनी दिलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com