साई संस्थानचं विश्वस्त मंडळ जाहीर;  अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे  आमदार आशुतोष काळे

साई संस्थानचं विश्वस्त मंडळ जाहीर; अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे

Published by :

कूणाल जमदाडे, शिर्डी / अहमदनगर | गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची घोषणा करण्यात आली आहे.कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे जगदीश सावंत यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. एकूण 12 जणांचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारडून जाहीर करण्यात आले आहे.

गेल्या 4 वर्षांपासून साईबाबा संस्थानचा कारभार औरंगाबाद उच्च न्यायालयाने नेमलेल्या चार सदस्यीय समितीकडून सुरू होता. शिर्डीतील स्थानिक ग्रामस्थ उत्तमराव शेळके यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाने विश्वस्त मंडळ नेमण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू झाल्या होत्या. शिर्डीतून 50 टक्के विश्वस्त नेमण्याची मागणी होती. मात्र आजच्या यादीत 3 जणांना संधी देण्यात आली आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ स्थापन करा.

महाविकास आघाडीत असलेल्या तिन्ही पक्षांच्या समन्वय बैठकीत शिर्डी राष्ट्रवादीला तर पंढरपूर काँग्रेसला देण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर शिर्डी संस्थानच्या संभाव्य विश्वस्त मंडळाची यादी सोशल मीडियातून व्हायरल झाली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने अधिकृत नावांची घोषणा केली असून या यादीत अहमदनगर जिल्ह्याला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील 9 जणांना विश्वस्त मंडळात संधी देण्यात आली आहे.याप्रसंगी आ.आशुतोष काळे यांच्या समवेत सलग तिसऱ्यांदा विश्वस्त झालेले डॉ.एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, महेंद्र शेळके, सचिन गुजर, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, अविनाश दंडवते, जयंत जाधव, सुहास आहेर आदींनी पदभार स्वीकारला. साईसंस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी नुतन विश्वस्त मंडळाचा सत्कार केला.साईभक्तांच्या सुविधेसाठी सहकारी विश्वस्त संस्थान अधिकारी कर्मचारी आणि शिर्डीकर ग्रामस्थ यांच्या विचारातून विकास काम करण्याचा निर्धार नुतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com