केमिकलच्या टँकरला आग

केमिकलच्या टँकरला आग

Published by :


निसार शेख
रविवारी दुपारी मुंबई-गोवा महामार्गावर एका केमिकलच्या टँकरला आग लागली. हा टँकर गोव्याच्या दिशेने जात होता.

टँकरने अचानक पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. काळ्या धुराच्या लोळाने परिसरातील प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. अग्निशामक दलाची गाडी घटना स्थळी पोहोचली असली तरी अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागलेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com