छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा वाद पेटला; पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा वाद पेटला; पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट

सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचा वाद पेटलेला आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचा वाद पेटलेला आहे. संतप्त शिवप्रेमींनी इस्लामपूर-सांगली रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन सुरु केलं. त्यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली असून सौम्य लाठी चार्ज करण्यात आला आहे. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा वाद पेटला; पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट
'शिवसेना-वंचित युती रोखण्यासाठी फडणवीस राष्ट्रवादीच्या चाव्या दाबतील'

आष्टा येथील मध्यरात्री शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळयाची गनिमी काव्याने प्रतिष्ठापना केली. काही वेळातच या ठिकाणी महाआरती होणार होती. मात्र, कायद्यानुसार प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरामध्ये 144 कलम लागू केल आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी 500 मीटरच्या बाहेर जाऊन महाआरती केली. सदर जागेबाबत शासकीय रक्कम भरणार असल्याचे सुद्धा शिवप्रेमींनी सांगितलं. मात्र, रात्रीच हा पुतळा हटवण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे आंदोलन आक्रमक झाले आणि आष्टा शहरातील प्रमुख रस्त्यावर त्यांनी रास्ता रोको सुरू केला.

यावेळी पोलीस आणि आंदोलन यांच्या जोरदार झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केल्यानंतर सौम्य लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि इस्लामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष निशिकांत दादा पाटील यांच्या सहित आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com