चीनचा ताप; मुंबई विमानतळावर प्रवासी तपासणी सुरू

चीनचा ताप; मुंबई विमानतळावर प्रवासी तपासणी सुरू

आरोग्य विभागाने राज्यातील जिल्हा रुग्णालय, महापालिका रूग्णालयांसह खासगी रुग्णालयांनाही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
Published by :
shweta walge

आरोग्य विभागाने राज्यातील जिल्हा रुग्णालय, महापालिका रूग्णालय आणि खासगी रुग्णालय यांना मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. केंद्रानेही एका पत्राद्वारे चीनसारखीच परिस्थिती भारतात उद्भवल्यास रुग्णालयाच्या तयारीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार, संपूर्ण यंत्रणा सतर्क होऊन कामाला लागली आहे.

चीनचा लहान मुलांचाही ताप नको म्हणून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष दिले जात आहे. चीनमध्ये मुलांच्या न्युमोनियाचे रुग्ण वाढू लागले असून, त्यात प्रामुख्याने इन्फ्ल्यूएंझा, मायकोप्लाझा आणि सार्स कोविड - १९ चे रुग्ण अधिक आहेत. यामुळे जगभरातील देशांना जागतिक आरोग्य संघटनेने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर मुंबई विमानतळावरही थर्मल स्क्रीनिंग केलं जात आहे.

चीनच्या उत्तरेकडील भागांमध्ये इन्फ्लूएन्झा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, आदी आजारांची प्रचंड साथ पसरत आहे. त्यातून तापाने फणफणलेल्या लहान मुलांची संख्या अधिक आहे. याची दखल घेत देशामध्ये कोविड काळात परिस्थिती अत्यंत भयानक होती. याची खबरदारी म्हणून आरोग्य विभागाकडून ही खबरदारी घेतली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com