नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावेः बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन; कारण?

नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावेः बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन; कारण?

पवई निम्‍नस्‍तरीय जलाशय कप्‍पा दुरूस्‍ती कामामुळे कुर्ला पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता
Published by :
shweta walge

बृहन्मुंबई महानगरपालिकेने पवई निम्‍नस्‍तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक १ व २ च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या दुरुस्तीसाठी पावसाळा वगळता १३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. कप्पा क्रमांक १ ची दुरुस्ती ही सोमवार, दिनांक ६ नोव्‍हेंबर २०२३ पासून सुरु करण्यात येणार आहे. त्‍यामुळे एकाच कप्‍प्‍यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. सबब, कुर्ला पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

कप्पा दुरूस्‍ती कामामुळे कुर्ला पश्चिम परिसरातील खालील प्रभागांमध्ये अथवा उंचीवरील वस्तींच्या भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

१) अंधेरी पूर्वः बामणदया पाडा, मारवा इस्टेट, अशोक टॉवर, उदय नगर, साकीनाका (पाणीपुरवठा वेळ- सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत)

२) घाटकोपर अंधेरी लिंक रोडः टिळक नगर, बामणदया पाडा, मारवा इस्टेट, अशोक टॉवर, उदय नगर, साकीनाका (पाणीपुरवठा वेळ- सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत)

३) कुर्ला-अंधेरी रस्ताः जरी मरी, विजय नगर, एल.बी.एस. नगर, शास्त्री नगर, शेट्टीया नगर, सत्य नगर जलवाहिनी, वायर गल्ली, ३ नंबर खाडी (पाणीपुरवठा वेळ- सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत)

जलाशयाच्‍या एकाच कप्प्यातून पाणीपुरवठा केला जात असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता सदर कालावधीत पाण्‍याचा जपून वापर करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com