CM Eknath Shinde : अयोध्येत राम मंदिर व्हावे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं

CM Eknath Shinde : अयोध्येत राम मंदिर व्हावे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं

अयोध्येतील राम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अयोध्येतील राम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. राम मंदिराच्या उदघाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 6000 हून अधिक लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मंदिर उभारणाऱ्या कलाकाराची मी भेट घेतली सगळ्यांचे स्वप्न होतं अयोध्या राम मंदिर व्हावं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्वप्न होतं.

अयोध्येत राम मंदिर व्हावं आणि ते मोदी साहेबांनी स्वप्न पूर्ण केलं. 22 तारखेला अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. याचा उत्साह देशभरात आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत आयोजित जिमखाना उत्सवाला भेट दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com