CM Eknath Shinde : मनोज जरांगे यांची भाषा कार्यकर्त्याची नाही ही राजकीय भाषा

CM Eknath Shinde : मनोज जरांगे यांची भाषा कार्यकर्त्याची नाही ही राजकीय भाषा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेतून बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेतून बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण सरकारनं दिलं. सर्वांनी एकमताने आरक्षण दिलं आहे. कोणावरही अन्याय न करता आपण आरक्षण दिलं. मराठा आरक्षण टिकणार नाही अशी चर्चा सुरु झाली. मराठ्यांच्या संयम, शिस्तीचं कौतुक आहे. जरांगेंच्या मागण्या बदलत गेल्या. जरांगेंनी जे जे सांगितले ते ते केलं. 10 टक्के दिलेलं आरक्षण हे टिकणारं. स्वतंत्र मराठा आरक्षण दिलं.

मराठा आरक्षण कायद्यानं दिलं. इतकं वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती. मग मराठा समाजाला अजून आरक्षण का दिलं गेलं नाही. राज्य सरकारला 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही. मागास असतानाही मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं. आरक्षण का टिकणार नाही हे सांगावं. आरक्षण दिल्यानंतरही समाजात संभ्रम निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न. मराठा समाजाला आरक्षण देताना सर्व बाबी लक्षात घेतल्या गेल्या. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देता येणारं नाही, हे स्पष्ट सांगितलं होतं.

जरांगेंनी फडणवीसांवर खालच्या पातळीवर आरोप केले. जरांगेंची भाषा राजकीय आहे. एकेरी भाषेत बोलणं चुकीचं. जे कायद्याच्या चौकटीत बसत नाही त्याची मागणी करणं योग्य नाही. कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. सर्वांना सोबत घेऊन राज्य पुढे न्यायचं आहे. हे करा, ते करा, हे गाव बंद, रस्ता बंद, ही काय भाषा आहे का ? मनोज जरांगे यांची भाषा कार्यकर्त्याची नाही ही राजकीय भाषा आहे. माझ्यावरही खालच्या पातळीची टीका केली गेली.असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com