CM Eknath Shinde : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन

CM Eknath Shinde : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन

छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती जगभरात साजरी केली जात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती जगभरात साजरी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार. कोणत्याही समाजावर अन्याय करणार नाही. कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून पुन्हा एकदा उपोषण करण्यात येत आहे. उद्याच्या अधिवेशनात कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com