मुख्यमंत्र्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना पत्र, संप मागे घेण्याची विनंती

मुख्यमंत्र्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना पत्र, संप मागे घेण्याची विनंती

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला राज्यातल्या एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेलेल असताना दुसरीकडे राज्य सरकारने ३५० कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. तसेच, राज्य सरकाराने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट एसटी कर्मचाऱ्यांना विनंती करणारे पत्र लिहिले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com