काँग्रेस ‘कन्फ्यूजन’ पार्टी; ‘हा पक्ष स्वत:चं आणि देशाचंही भलं करू शकत नाही’

काँग्रेस ‘कन्फ्यूजन’ पार्टी; ‘हा पक्ष स्वत:चं आणि देशाचंही भलं करू शकत नाही’

Published by :

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यसभेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव सादर केला. सुरुवातीला विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतर मोदींनी आपलं भाषण कायम ठेवलं. तर, काही सदस्यांनी सभात्याग देखील केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप विरोधी पक्षांवर केला. मोदींनी टिका करताच काँग्रेस नेत्यांनी सभागृहातून वॉकआऊट केला. तसेच त्यांनी काँग्रेसचा 'कन्फ्यूजन पार्टी' असा उल्लेख केला.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काँग्रेसच्या खासदारांकडून सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले डागले आहे. 'सध्याच्या घडीला काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की, हा पक्ष धड स्वत:चं भलं करु शकत नाही आणि देशाचंही भलं करू शकत नाही', असे म्हणत नरेंद्र मोदी कॉंग्रेसवर टीका केली आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेसमध्ये सध्या दुफळी आणि संभ्रमाचे वातावरण आहे', असा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेसची राज्यसभेत एक भूमिका असते. तर लोकसभेत दुसरी भूमिका आहे. काँग्रेस इतकी विभागलेली आणि संभ्रमित पार्टी मी कधी पाहिली नाही. सर्वात जुनी पार्टी पण सर्वात संभ्रमित असलेली पार्टी काँग्रेस आहे. काँग्रेस स्वतःच्या भल्यासाठी काही करू शकत नाही. तसेच देशाचेही प्रश्न काँग्रेस सोडवू शकत नाही. यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते, अशी कडवट टीका मोदी यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com