महाराष्ट्र
पंतप्रधान शालेय पोषण आहार योजनेतील भ्रष्टाचार एकनाथ खडसेंकडून उघड
पोषण आहाराचे किडलेले धान्य व वजनापेक्षा कमी भरलेले साहित्य साहित्य आढळून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा खडसेंचा आरोप
मंगेश जोशी | जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील शाळांना भेट दिली आहे. पंतप्रधान शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची पाहणी केली असता पोषण आहारातील भ्रष्टाचार उघड केला आहे.
एकनाथ खडसेंकडून पाहणी करण्यात आलेल्या पोषण आहारातील धान्याला कीड लागलेले आढळून आले आहे. तसेच, हळद, जिरं, मोहरी हे साहित्य देखील वजनापेक्षा कमी आढळून आले आहे. त्यामुळे या योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.