पैठण तहसिल कार्यासयासमोर छावा क्रांतीवीर सेनेचे धरणे आंदोलन

पैठण तहसिल कार्यासयासमोर छावा क्रांतीवीर सेनेचे धरणे आंदोलन

Published by :

सुरेश वायभट/पैठण : पैठण तहसील कार्यालयात मुद्रांक , फेरफार अर्ज , नक्कल अश्या विविध शासकीय कामकाजासाठी लागणाऱ्या कागदपत्रे यांची अव्वाच्या सव्वा किंमतीत विक्री करून नागरिकांची अर्थीक लूट होत असल्यामुळे हि लुट तत्काळ थांबवावी या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत , मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे , मराठवाडा सचिव भगवान सोरमारे , ज्ञानेश्वर पाटील तांगडे , ऋषिकेश वाघे , कैलास सातपुते , ज्ञानेश्वर पठाडे , माऊली काळे , सतीश राऊत , गोविंद बावणे , राकेश वाघे , ईश्वर कांबळे , आबा मगरे , शिवाजी मगरे , नितीन ब्रह्मराक्षस , नारायण कवले , राधाकिसन तळपे , अन्सार पठाण , कृष्णा नागरे , पंडित मैंद , ज्ञानेश्वर तावरे , संतोष डोळस , स्वप्निल राजेभोसले , भारत सोरमारे , रामेश्वर येरे , दीपक भवरे , कुंदन शेळके , रामेश्वर कणके , मनोहर नरवडे , नितीन भोसले आदी उपस्थित होते .

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com