Farmer Protest : शेतकऱ्यांचं वादळ दिल्लीत धडकणार; सीमेवर मोठा बंदोबस्त

१३ फेब्रुवारी आज शेतकऱ्यांचे मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

१३ फेब्रुवारी आज शेतकऱ्यांचे मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. देशभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चंडीगडमध्ये केंद्र सरकारशी चर्चेची पहिली फेरी झाली असली तरी त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याची माहिती मिळत आहे.

पिकांच्या किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्लीच्या आले आहेत. शेतकऱ्यांचा हा मोर्चा रोखण्यासाठी सीमेवर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा हा मोर्चा रोखण्यासाठी सीमेवर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कलम १४४ लागू करण्यात आले आहे, सीमांवर काँक्रीटचे बॅरिकेड्स आणि कंटेनर लावण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com