Ajit Pawar
महाराष्ट्र
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज 'या' ठिकाणी प्रचार सभा
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. बैठका, प्रचार सभा होत आहे. प्रचार जोरदार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड, कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात उतरले असून माजलगाव, धारूर, मुरगुडमध्ये आज अजित पवार प्रचार सभा घेणार आहेत. आज निवडणूक प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजलगाव येथे सकाळी 9.30 वाजता अजित पवारांची जाहीर सभा होणार आहे तर दुपारी 12.30 वाजता धारूर येथे सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.
Summery
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड, कोल्हापूर दौऱ्यावर
निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात
माजलगाव, धारूर, मुरगुडमध्ये घेणार प्रचार सभा
