धुळे - नंदुरबार जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल

धुळे - नंदुरबार जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आता गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे.
Published by :
Team Lokshahi

विशाल ठाकूर | धुळे : मागील काही दिवसांपासून राज्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावायला सुरवात केली आहे. काही ठिकाणी अजूनही पाऊस होत असला तरी मात्र राज्यातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या व कोरडा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आता गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. बेमोसमी पावसाने उघडीप दिल्याने धुळ्यातील रस्त्यांवर सकाळी धुळ्याची चादर पांघरलेली दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पारण फेडणार दृश्य बघायला मिळतं आहे. यामुळे आता सकाळच्या सुमारास घराबाहेर फिरायला येणाऱ्यांची गर्दी देखील आता वाढायला सुरुवात झाली आहे. या अल्हाददायक थंडीचा अनुभव नागरिक घेत आहे. धुक्यात हरवलेले रस्ते, झाडी, ठिकठिकाणी पडलेले दवबिंदू बघणाऱ्याच्या मनाला सुखद अनुभूती देत आहे. मात्र दुसरीकडे दात दुःख असलेला वाहन चालकांना रस्त्यावरून वाट काढत असताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अपघाताचा धोका देखील संभवत असून वाहन चालकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com