महानगरपालिका पोटनवडणुकीत भाजपच्या आरती अरुण पवार विजयी

महानगरपालिका पोटनवडणुकीत भाजपच्या आरती अरुण पवार विजयी

Published by :

उमाकांत अहिरराव : धुळे | धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 च्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली होती. माजी आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे यांनी राजीनामा दिल्याने या प्रभागाची पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोट निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या आरती अरुण पवार या तब्बल 3 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत.

त्यांच्या विजयानंतर भाजपच्यावतीने धुळे शहरातील मुख्य भाजपाच्या कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. त्याची आतषबाजी करीत भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या तालावर ठेका धरला.महापौर प्रदीप कर्पे यांनी देखील कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला. प्रभाग क्रमांक 5 च्या नागरिकांनी भाजपवर विश्वास दाखवत उमेदवाराला विजयी केल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com