Dive Ghat
Dive Ghat

Dive Ghat : आज 'या' वेळेत दिवेघाट राहणार बंद; काय आहे पर्यायी मार्ग?

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

रस्ता रुंदीकरणामुळे दिवेघाट बंद

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

आज सकाळी 11 ते दुपारी 2 वाहतूक बंद राहील

(Dive Ghat) रस्ता रुंदीकरणामुळे आज दिवेघाट बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही दिवेघाटातील वाहतूक बंद राहणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गांतर्गत हडपसर ते दिवेघाट या पॅकेज 6 मध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणा मार्फत सुरू असल्याने हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे.

यासाठी वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पकाई पुणेचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांच्याकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

वाहनचालकांसाठी कात्रज-बोपदेव घाट (राज्य मार्ग क्र. 131) मार्गे सासवड, खेडशिवापूर-सासवड लिंक रोड मार्गे सासवड, कापूरहोळ-नारायणपूर (राज्य मार्ग क्र. 119) मार्गे सासवड तसेच हडपसर-उरळी कांचन-शिंदवणे घाट मार्गे (राज्य मार्ग क्र. 61) सासवड या पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com