प्रकाशा येथील वृद्धाश्रमातील निराधारांची दिवाळी पोलिसांनी केली गोड

प्रकाशा येथील वृद्धाश्रमातील निराधारांची दिवाळी पोलिसांनी केली गोड

Published by :

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रकाशा येथे वृद्धाश्रम असून या आश्रमात अनेक निराधार वृद्ध व्यक्ती राहत असतात. शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी कर्मचार्‍यांसह प्रकाशा येथील वृद्धाश्रमात दिवाळी साजरी केली.

वृद्धाश्रमातील व्यक्तींसोबत त्यांनी दिवाळीचा फराळ ही घेतला पोलिसांकडून माणुसकीने होणारे विचारपूस आणि मानसन्मान पाहून तेथील निराधारांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहण्यास मिळाला पोलीस निरीक्षक पवार यांचा हा उपक्रम समाजाला दिशा देणारा ठरेल

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com