लांजात दुहेरी हत्याकांड! पतीनेच संपविले पत्नी आणि मुलाला

लांजात दुहेरी हत्याकांड! पतीनेच संपविले पत्नी आणि मुलाला

पत्नीवर कोयत्याने वार करत आपल्या सहा वर्षीय बाळाचा देखील बळी घेत दोघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना लांजा तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथे घडली आहे
Published by :
Team Lokshahi

निसार शेख | लांजा: पत्नीवर कोयत्याने वार करत आपल्या सहा वर्षीय बाळाचा देखील बळी घेत दोघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना लांजा तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथे घडली आहे. या घटनेनंतर सैतानाला लाजवेल असे कृत्य करणारा तरुण घटनेनंतर बेपत्ता झाला असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या थरारक हत्याकांडाने लांजा तालुका हादरून गेला आहे. मात्र या हत्याकांडाचे कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संदेश चांदवडे हा लांजा तालुक्यातील रहिवासी आहे. तो आपल्या आई आशा चांदवडे, पत्नी सोनाली चांदवडे, मुलगा प्रणव आणि पियुष चांदवडे यांच्यासह कोट पाष्टेवाडी येथे राहत होता.

पत्नी सोनाली बरोबर झालेल्या वादातून आज पहाटेच्या सुमारास संदेश याने आपल्या सहा वर्षीय बालक प्रणव याचा बळी घेतला. तर पत्नी सोनाली हिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये दोघेही जागीच गतप्राण झाली. या घटनेनंतर संदेशने पलायन केले.

पहाटे साडेसहा वाजण्याच्या दरम्यान संदेश याची आई आशा उठल्या असता त्यांना घरात संदेश व सून सोनाली न दिसल्याने हाका मारत असता ती ही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आली. तिच्या जोरजोरात रडण्याने शेजारीपाजारी जमा झाले. त्यांनी या हत्याकांडाची पोलिसांना दिली. आरोपी संदेश चांदवडे याचा पोलीस शोध घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com