विनायक मेटेंच्या कार अपघात प्रकरणाच्या तपासासाठी नेमली आठ पथके; शोध सुरु

विनायक मेटेंच्या कार अपघात प्रकरणाच्या तपासासाठी नेमली आठ पथके; शोध सुरु

विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झालं आहे. परंतु, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मराठा ठोक क्रांती मोर्चाने व्यक्त केला आहे.

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झालं आहे. परंतु, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मराठा ठोक क्रांती मोर्चाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यानुसार आठ पथके तयार करण्यात आली आहेत.

विनायक मेटे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. मेटेंच्या ड्रयव्हरने थर्ड लेनमधून मधील लेनमध्ये गाडी आणण्याचा प्रयत्न केला. व ट्रकचालकही लेन बदलत होता. यावेळी मेटेंच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. व भीषण अपघात झाला. यामध्ये मेटे यांना जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मेटेंच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. तर, मराठा ठोक क्रांती मोर्चाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या अपघाताच्या सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. यानुसार आठ पथके स्थापन करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय मोहिते, श्वान पथक अपघात स्थळी दाखल झाले आहेत. एसपीजी, आरटीओ अशी आठ पथके तपास करणार आहेत. तपसासाठी एक्स्प्रेस हायवेवरील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेणार आहेत. पोलिसांची दिरंगाई असल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करताना भातान बोगद्याजवळ विनायक मेटे यांच्या गाडीचा ताबा सुटल्याने दुसऱ्या वाहनावर आदळली. विनायक मेटेंच्या ड्रायव्हरने गाडीत एअरबॅग असल्याने बचावल्याचे सांगितले. अपघातानंतर एक तास होऊनही आम्हाला कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोपही त्याने केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com