राज्यसभेच्या 6 जागांसाठी 'या' दिवशी होणार निवडणूक; भाजपकडून कुणाला संधी मिळणार?

राज्यसभेच्या 6 जागांसाठी 'या' दिवशी होणार निवडणूक; भाजपकडून कुणाला संधी मिळणार?

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पार पडली.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यसभेच्या 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पार पडली. या बैठकीत काही नावांवर चर्चा झाली असल्याचे समजते.

महाराष्ट्रात 27 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत भाजपकडून कोणाला संधी देण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, माजी मंत्री पंकजा मुंडे, अमरीश पटेल यांची नावे चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, ही नावेदेखील चर्चेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com