मुलबाळं, गुरांसह अख्ख गावाचं बसले उपोषणाला; नेमके कारण काय?
संदीप शुक्ला | बुलढाणा : एकीकडे देश स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. शासनाने तीन दिवसांचे कार्यक्रम जाहीर केले आहेत. घर घर तिरंगा कार्यक्रम घोषित केला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील आदिवासी बहुल संपूर्ण गावचे गाव आपल्या मागण्यांसाठी आपले मूलं-बाळ, जनावरांसह उपोषणाला बसले आहेत. या उपोषणग्रस्तांना न्याय कधी मिळेल हा प्रश्न आहे.
जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पळशी वैद्य व पळशी घाट हे दोन गावे जिगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असूनही या गावांना धरणग्रस्त म्हणून बुडीत क्षेत्राचा दर्जा देण्यात आला नाही. या गावांना धरणग्रस्त बुडीत क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी आजपासून दोन गाव आपल्या गुरांसह महिला, पुरुष व बालक गावात आमरण उपोषणाला बसले आहेत.
गेल्या २३ वर्षांपासून लढा देत असलेले गावकरी आज एकत्र येत दोन गावातील संपूर्ण नागरिक आपल्या गुरंसह उपोषणाला बसले आहेत. आम्ही गेल्या २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत वाचलो. मात्र पुढे आम्ही जिवंत राहू किंवा नाही याची शाश्वती नसल्याने आता उपोषण हाच एक मार्ग असल्याच गावकऱ्यांनी सांगितलं.