Sangli : निकृष्ट दर्जाच्या जेवणासाठी वस्तीगृहाच्या मुलांचे अन्नत्याग आंदोलन

Sangli : निकृष्ट दर्जाच्या जेवणासाठी वस्तीगृहाच्या मुलांचे अन्नत्याग आंदोलन

सांगलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहामध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने मुलांनी वस्तीगृहाच्या बाहेरच अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
Published by :
Team Lokshahi

संजय देसाई | सांगली : सांगलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहामध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने मुलांनी वस्तीगृहाच्या बाहेरच अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मुलांनी जेवण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अशी घोषणाबाजी देत हातामध्ये ताट घेऊन हे आंदोलन सुरू केले आहे.

सांगलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून निकृष्ट दर्जाचे जेवण ठेकेदार पुरवत असल्याने याविरोधात मुलांनी तक्रार केली. परंतू कोणतीही कारवाई झाली नसल्याने आज मुलांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. भोजन ठेका बदलून दिला पाहिजे. शैक्षणिक खर्च आणि निर्वाह भत्ता तात्काळ मिळालाच पाहिजे,अशा अनेक मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com