महाराष्ट्र
खड्डे महाराष्ट्रात,अधिकारी परदेशात! रस्त्यांच्या अभ्यासासाठी विदेश दौरा
ग्रामीण महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था भीषण असताना राज्य सरकारचे 19 अधिकारी रस्त्यांच्या अभ्यासासाठी या मागणीसाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेले.
संदीप शुक्ला | बुलढाणा : ग्रामीण महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था भीषण असताना राज्य सरकारचे 19 अधिकारी रस्त्यांच्या अभ्यासासाठी या मागणीसाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेले. याहून धक्कादायक बाब म्हणजे सरकारच्या रस्ते प्रकल्पांसाठी सल्लागार असलेल्या कंपनीनं हा दौरा प्रायोजित केला आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी परदेशात जाऊन सरकारी अधिकारी कोणता अभ्यास करणार आहेत, असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा नीट आहे की नाही याची देखरेख जरी व्यवस्थित ठेवली तरी महाराष्ट्रातले पन्नास टक्के रस्ते सुधारतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यामुळं प्रस्तावित परदेश दौरा रद्द करण्याची मागणी सामान्यांमधून होऊ लागली.