Suryakanta Patil : माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी SPच्या वाटेवर?

Suryakanta Patil : माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी SPच्या वाटेवर?

माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी SPच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी SPच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. सूर्यकांता पाटील आज राष्ट्रवादी SPमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सूर्यकांता पाटील यांनी नुकताच भाजप पक्षाला रामराम ठोकला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप च्या नेत्या सूर्यकांता पाटील यांचा आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात पक्षप्रवेश होणार आहे. 2014 ला सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजप पक्षात प्रवेश केला होता.

हिंगोली लोकसभा मतदार संघातून यंदा निवडणूक लढण्याची ईच्छा सूर्यकांता पाटील यांनी व्यक्त केली होती, पण ती जागा युतीत शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांना तिथून निवडणूक लढता आली नाही. यासंदर्भात सूर्यकांता पाटील यांनी आपली उघड नाराजी दर्शवली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com