महाराष्ट्र
Watch Video | आरोपीस पकडण्यास आलेल्या गुजरात पोलिसांना मुंबईत मारहाण
मुंबईच्या भिवंडीत राहणाऱ्या एका आरोपीस पकडण्यास आलेल्या स्थानिक पोलिसांसह गुजरात पोलिसांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. आरोपीला अटकेत घेताना त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने पोलिसांना मारहाण केली. या संदर्भातला व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
भिवंडी शहरातील कसाई वाडा येथे शुक्रवारी कुविख्यात गोवंश तस्कर जमील कुरेशी यास वापी गुजरात येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी गुजरात पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकासह आले होते. दरम्यान पोलीस आल्याचे पाहता चौथ्या मजल्यावरील घरात असलेल्या जमील कुरेशीने थेट घरातून उडी घेतली. यामध्ये आरोपी जमील कुरेशीचा मृत्यू झाला.
यावेळी संतप्त जमावाने गुजरात व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जमील कुरेशी यास ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला असा आरोप करीत पोलीस पथकावर हल्ला करीत मारहाण केली.

