Pankaja munde |”पंकजा मुंडे शिवसेनेत आल्‍या तर सन्‍मानच”

Pankaja munde |”पंकजा मुंडे शिवसेनेत आल्‍या तर सन्‍मानच”

Published by :

मंगेश जोशी । भाजप नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा बातम्या गेल्या काही दिवसांपासून अनेक माध्यमांत झळकत आहेत. यावर अद्याप तरी पंकजा मुंडे यांनी भाष्य केले नाही आहे. मात्र केंद्रीय मंत्रीपदी प्रीतम मुंडे यांना डावलणे, तसेच भाजप पदाधिकाऱ्यांचे एका मागोमाग राजीनामे त्यामुळे पंकजा या नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देत पक्ष नेतृत्वाला इशाराही दिला. या सर्व घडामोडीत आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी पंकजा मुंडे यांना थेट शिवसेना प्रवेशाचीच ऑफर दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील कीनोद गावात मंत्री गुलाबराव पाटील हे आज शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी पंकजा मुंडे यांच्यसंदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले. विधानसभा निवडणूकीनंतर पंकजा मुंडे यांना भाजपामध्ये हवे तसे प्रतिनिधीत्‍व मिळाले नाही. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपच्या पडतीच्‍या काळात खुप मोठे काम केले आहे. मात्र त्‍यांच्‍या कन्‍या पंकजा मुंडे यांना संघर्ष करावा लागत असून चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ खडसे पंकजा मुंडे यासारख्या नेत्यांना डावलून भाजपकडून ओबीसी समाजाचे खच्चीकरण केला जात असल्याची टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली.

मुंडे परिवाराचे काम आभाळा ऐवढे मोठे काम आहे. यामुळे त्‍यांच्‍या वारसदाराला कुठेतरी न्‍याय, सन्‍मान मिळेल अशी समाजाची अपेक्षा आहे. यामुळे पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्‍या तर त्‍यांचे स्‍वागत राहिल; त्‍यांना येथे स्‍थान व सन्‍मान मिळेल; असे ही यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com