Asim Sarode
Asim Sarode

Asim Sarode : शिवसेना पक्ष चिन्हाबाबत उद्या सुनावणी; अ‍ॅड. असीम सरोदे यांचे ट्विट, म्हणाले...

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर उद्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Asim Sarode) शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर उद्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सलग दोन दिवस युक्तिवाद ऐकून घेतले जाणार आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ या ऐतिहासिक प्रकरणावर सुनावणी घेणार आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यानच न्यायालयाने अंतिम सुनावणीचा संकेत दिला होता. त्यामुळे आता या प्रकरणावर लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अ‍ॅड. असीम सरोदे यांनी शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणीवर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. असीम सरोदे म्हणाले की, 'शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह. सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी reach होणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न - जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल.'

'शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील.सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल.' असे असीम सरोदे यांनी ट्विट केलं आहे.

Summary

  • शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर उद्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

  • अ‍ॅड.असीम सरोदे यांची प्रतिक्रिया

  • ' शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com