मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात

Published by :

राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळते. यावर्षीही यात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. (Mumbai Rain)

मुंबईतील बोरिवली पूर्व भागात रविवार पहाटेपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे, परिसरात सगळीकडे पाणी साचलं (Rainwater Entered Mumbai's Borivali East Area) आहे. रस्त्यांवर साचलेल्या या पाण्यामध्ये काही चारचाकी गाड्याही वाहून गेल्या आहेत.

ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडिओही (Video) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही चारचाकी गाड्या पावसाच्या पाण्यात वाहून जात असल्याचं पाहायला मिळतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com