मनोज जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत 25, 26 जानेवारीला अवजड वाहनांना बंदी

मनोज जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत 25, 26 जानेवारीला अवजड वाहनांना बंदी

मराठा आंदोलकांचा 25 जानेवारीला नवी मुंबईमध्ये मुक्काम असणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मराठा आंदोलकांचा 25 जानेवारीला नवी मुंबईमध्ये मुक्काम असणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मराठा आंदोलक मुंबईसाठी निघाले असून २५ जानेवारीला ते नवी मुंबईमध्ये येणार आहे.

मनोज जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता 25 जानेवारी रात्री 12 ते 26 जानेवारीला रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबई शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जालनाच्या अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा आज पुण्यात दाखल झाला आहे.

हजारो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. 25 जानेवारी रोजी हा मोर्चा नवी मुंबईत धडकणार आहे. यामुळे आता नवी मुंबई पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात 25 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून 26 जानेवारी रोजी रात्री 8 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेशास मनाई केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com