दरड कोसळल्यामुळे महामार्गाचे नुकसान

दरड कोसळल्यामुळे महामार्गाचे नुकसान

Published by :

रत्नागिरी कोल्हापूर NH१६६ महामार्गावर साखरपा ते आंबा घाट या सेक्शनमध्ये १२ ठिकाणी दरड कोसळल्या मुळे, महामार्गाचे नुकसान झाले आहे, तसेच महामार्गाचा काही भाग तीन ठिकाणी तुटला आहे.

सदर ठिकाणी महामार्गावरील दरड कोसल्यामुळे महामार्गावरील मलबा काढण्याचे काम यद्ध पातळीवर सुरू आहे आणि खचलेला भरावं दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.सदर दुरुस्तीचे काम पुढील पाच दिवस चालू राहणार आहे , त्यामुळे पुढील पाच दिवस महामार्ग बंद राहणार आहे आणि त्यानंतर सदर महामार्गाची परत पाहणी करून, महामार्गावर फक्त हलक्या वाहनाची वाहतूक सुरू करता येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com